दोन तत्वे
तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल
पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल...
माणसाला बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात ...
पण "काय बोलावे" हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते...
कुठलंही काम, तुमच्या जिवापेक्षा मोठं नाही.
तुमच्या आयुष्यासाठी नोक-या, आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही.
कृपा करून जमेल, झेपेल एवढंच काम हातात घ्या; त्यासाठी आग्रह धरा.
प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणा-या जबाबदा-या अंगावर घेऊ नका.
तुमच्या जिवापेक्षा मौल्यवान काहीही नाही, याचं भान ठेवा.
कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम ऑफिसमधल्या कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देणारं ठरतं.
ऑफिसमधले ताणतणाव, स्पर्धा, पक्षपात इ. घरी घेऊन न येता, तिथंच विसरून या.
स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या.
ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवा.
कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जिवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही, याबद्दल खात्री बाळगा. ज्यांच्या सगळ्या आशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई-वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचा हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा.
त्यासाठी तुम्ही दीर्घायुषी स्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे.
तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडी-निवडी जपा, स्वतःसाठी थोडातरी वेळ काढा.संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इ. चा उपयोग करा.
हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं. तरीही आपण धावतो- ऊर फुटेस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही.
दोन तत्वे
"एक म्हणजे क्षुल्लक गोष्टींसाठी ताण निर्माण करू नका."
"एक म्हणजे क्षुल्लक गोष्टींसाठी ताण निर्माण करू नका."
"दुसरं म्हणजे आयुष्याच्या अखेरीस सगळ्या गोष्टी क्षुल्लकच असतात "
आयुष्याची वाटणी
या जगाची निर्मिती करतांना परमेश्वराने आधी
गाय बैल बनवले आणि त्यांना सांगितले, “तुम्ही जन्मभर उन्हातान्हात कष्ट करून मानवांची सेवा करा. तुम्हाला मी
साठ वर्षांचे आयुष्य देतो.”
त्यावर ते म्हणाले, “नको, आम्हाला वीस
वर्षे पुरेत. चाळीस वर्षे परत घ्या.”
त्यानंतर परमेश्वराने कुत्र्याला बनवले आणि सांगितले, “तू मानवांच्या दारात बसून भुंकत रहा. तुला मी वीस वर्षांचे आयुष्य देतो.”
त्यावर तो म्हणाला, “नको, मला दहा
वर्षे पुरेत. दहा
वर्षे परत घ्या.”
त्यानंतर परमेश्वराने माकडाला बनवले आणि सांगितले, “तू उड्या मारून मानवांची करमणूक कर.
तुला मी वीस
वर्षांचे आयुष्य देतो.”
त्यावर तो म्हणाला, “नको, मला दहा
वर्षे पुरेत. दहा
वर्षे परत घ्या.”
अखेर परमेश्वराने माणसाला बनवले आणि सांगितले, “तू झोपा काढून, खेळून आणि खाऊन पिऊन मजा कर.
तुला मी वीस
वर्षांचे आयुष्य देतो.”
त्यावर तो म्हणाला, “हे काय, मला
फक्त वीस वर्षे ? या इतर प्राण्यांनी परत
केलेली वर्षे पण
मला द्या.”
परमेश्वर म्हणाला,”तथास्तु.”
म्हणूनच देवाने दिलेली पहिली वीस वर्षे माणूस मजेत घालवतो, त्यानंतर चाळीस वर्षे बैलासारखे काबाडकष्ट करून घरसंसार चालवतो, त्यानंतर दहा वर्षे माकडा सारखे नातवंडांचे मनोरंजन करतो आणि अखेरची दहा वर्षे कुत्र्यासारखा बसून राहतो..
सुरेश भटांच्या चार
सुंदर ओळी..
आयुष्य छान आहे
थोडे लहान आहे !
रडतोस काय वेड्या.?
लढण्यात शान आहे.!
अश्रूच यार माझा
मदिरेसमान आहे
!
काट्यातही फुलांची
झुलती कमान आहे !
उचलून घे हवे
ते
दुनिया दुकान आहे !
जगणे निरर्थ म्हणतो
तो
बेइमान आहे.
"सुखासाठी कधी हसावं लागंत ,
तर कधी
रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला
पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा